पोस्ट ऑफिस 'समृद्धी सुकन्या योजना' - आपल्या मुलीच्या भविष्याची आता चिंता नको...
केंद्र शासनाच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या कार्यक्रमाचाच एक भाग असलेली ही एक उत्कृष्ट योजना आहे.आपल्या देशात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे.वर्षाला केवळ २५०/- रूपये भरून या योजनेत सहभागी होता येते.
योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये :-
१) एका कुटुंबातून या योजनेसाठी फक्त दोनच अर्ज करता येतील.जरय जुळ्या आणि तिळ्या बहिणी असतील तर जास्त अर्ज चालतील.पालकांमार्फत हे खाते १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे काढले जाते.
२)वर्षाला कमीत कमी २५० ते जास्तीत जास्त १५०००० पर्यंतची रक्कम या खात्यात जमा केली जाऊ शकते.
३)या योजनेचा कालावधी २१ वर्षे किंवा सज्ञान मुलीच्या विवाहापर्यंत आहे.
४)खाते उघडण्याच्या तारखेपासून ते २१ वर्षे कालावधीपर्यंत हे खाते Active म्हणजेच सक्रीय राहिल.त्यानंतर या योजनेचा कालावधी संपुष्टात येतो व यावर कोणतेही व्याज मिळत नाही.
५)ही योजना फक्त भारतीय निवासी ( Indian Residential) मुलीसाठीच आहे.अनिवासी भारतीय(Non residential india) मुलीस या योजनेचा लाभ घेता येत नाही.
६)मुलीच्या वयाची जेंव्हा १८ वर्षे पूर्ण होतील तेंव्हा तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील ५०% रक्कम काढण्याची सोय करुन देण्यात आली आहे.
७)योजनेच्या पहिल्या १४ वर्षांपर्यंत, खाते चालू ठेवण्यासाठी वरी सांगीतलेली वार्षिक २५० रुपयांची रक्कम भरणे आवश्यक आहे.जर ही रक्कम भरण्यास योजनाधारक असमर्थ ठरला तर ५० रु. अधिकची रक्कम आणि २५० रु. ही कमीत-कमी वार्षिक रक्कम भरणे खाते पुन्हा चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
या योजनेत खाते कसे उघडाल?
या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसने खूप चांगला मार्ग उपलब्ध करुन दिला आहे.
खालीलप्रकारे या योजनेसाठी अर्ज करता येईल...
अर्जदाराला आपल्या स्त्री अपत्याविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती यासाठी पुरवावी लागेल.यासोबतच ज्यांच्या आधारे हे खाते उघडले जात आहे त्या पालकांचीही माहिती यासाठी आवश्यक आहे.
खाते उघडण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता करावी लागेल...
१)स्त्री अपत्याचे नाव(मुख्य खातेधारक)
२)रक्ताच्या नात्यातील पालकांचे नाव (सहखातेधारक)
३)सुरुवातीची जमा रक्कम
४)स्त्री अपत्याची जन्म तारीख
५)मुख्य खातेधारकाचा जन्म दाखला
६)सहखातेधारकाचा फोटो आणि रहिवासी पुरावा
७)सध्याचा व कायमचा पत्ता
८)इतर KYC प्रमाणपत्रे (पॅन कार्ड,मतदान ओळखपत्र)
प्रत्यक्ष खाते उघडताना...
१)समृद्धी सुकन्या योजनेत खाते उघडण्यासाठीचा अर्ज पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन वा भारतीय पोस्टाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करा.
२)अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरा आणि फोटोसहित इतर कागदपत्रे जोडा.
३)कमीत-कमी रक्कम २५० /- आहे,ती भरा.
४)एकदा खाते उघड्यावर पण रोख रक्कम किंवा धनादेश या स्वरुपात रक्कम भरु शकता.
समृद्धि सुकन्या योजनेचे फायदे :
१)या योजनेत अनेक भरगच्च लाभ समाविष्ट आहेत.म्हणून ही अनेक प्रसिद्ध बचत योजनांपैकी एक योजना आहे.
२)२०२०-२१ या आर्थिक वर्षाला आधार वर्षे मानून, वार्षिक ७.६ % व्याजदर या योजनेमध्ये जमा रकमेवर आकारला जातो.
३)२१ वर्षांचा योजना कालावधी संपुष्टात येईपर्यंत जर खात्यावरुन काहीच रक्कम काढली नसेल तर त्या नंतरही या रक्कमेवर मिळणारा व्याजदर तसाच चालू राहिल.फक्त २१ वर्षांचा कालावधी संपल्यावर त्यात रक्कमेची भर घालता येणार नाही.
४)तुमचे राहण्याचे ठिकाण बदलले तर तुम्ही तुमचे योजनेसाठीचे पोस्ट ऑफिसही बदलू शकता.
५)आयकर विभागाच्या कलम ८० क नुसार या योजनेला आयकरातून वगळण्यात आले आहे.
या लिंक वर क्लिक करा.
अशाप्रकारची ही योजना आहे.वर्षाला केवळ २५०/- भरून तुम्ही आपल्या मुलीचे भवितव्य सुरक्षित करु शकता.प्रत्येक सजग पालकाने या योजनेचा जरुर विचार करावा.व या योजनेत आपल्या लेकीचे नाव दाखल करावे.