आनंदाची बातमी वाचा! SBI देत आहे FD वर भरघोस व्याज, येत्या १५ ऑक्टोबर पासून ह्या लोकांना मिळत आहे मोठा फायदा.
मित्रांनो, स्टेस्ट बँक ऑफ इंडिया ही एक आघाडीची राष्ट्रीयकृत बँक आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBI मध्ये ग्राहकांना FD वर बंपर व्याज मिळत आहे. बँक, एसबीआय पेन्शनधारकांना ही सुविधा दिली जात आहे. पेन्शनधारकांना आता 5 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 7.65% व्याज मिळू शकते.
बँकेच्या वेबसाइटनुसार, वाढलेले दर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत.
आनंदाची बातमी म्हणजे बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
देशातील सर्वात मोठी बँक SBI मध्ये ग्राहकांना FD वर बंपर व्याज मिळत आहे. बँक, एसबीआय पेन्शनधारकांना ही सुविधा दिली जात आहे. पेन्शनधारकांना आता 5 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 7.65% व्याज मिळू शकतं.SBI त्यांच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1% अतिरिक्त FD व्याज देत आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात म्हणजेच FD वर 20 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे.
ही वाढ सर्व कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर लागू होतील. बँकेच्या वेबसाइटनुसार, वाढलेले दर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. FD व्याजदरात 10 ते 20 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
मित्रांनो, सणासुदीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फिक्स्ड डिपॉझिट (FD) घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. होय.. SBI आता FD वर पूर्वीपेक्षा जास्त व्याज देईल. खरं तर, SBI ने सर्व मुदतीसाठी त्यांच्या FD चे व्याजदर 20 बेस पॉइंट्स पर्यंत वाढवले आहेत. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू होतील.
2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या SBI FD वर तुम्हाला किती परतावा मिळेल?
SBI ने 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीच्या FD वरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. त्याचप्रमाणे 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 4 टक्के व्याजदर आकारला जाईल. यापूर्वी या कालावधीसाठी 3.90 टक्के व्याजदर होता. त्याच वेळी, किरकोळ एफडीवरील व्याजदर 180 दिवस ते 210 दिवसांदरम्यान 4.65 टक्के झाला आहे.
जाणून घ्या कोणाला हा वाढलेला व्याजदराचा लाभ मिळेल?
15 ऑक्टोबरपासून एफडी इंटरेस्ट रेटमध्ये सुधारणा केल्यानंतर, ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या एफडीवरील व्याजदर 6.65% इतका वाढला आहे. याचा अर्थ SBI निवृत्तीवेतनधारकांना 5 वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीच्या ठेवींवर 7.65% (6.65% + 1%) व्याज मिळू शकतं. हे सर्वसामान्यांसाठी 3.00% ते 5.85% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50% आणि 6.65% दराने बँक व्याज देत आहे.
बँकेचे नवीन व्याज दर काय आहेत?
SBI ने 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वरील व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 3 टक्के केला आहे.
त्याचप्रमाणे 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या कालावधीसाठी ते चार टक्के करण्यात आले आहे. पूर्वी तो 3.90 टक्के होता.
180 ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी व्याज 4.55 टक्क्यांवरून 4.65 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
बँकेने एफडीवरील व्याजदर 211 दिवसांवरून एका वर्षापेक्षा कमी करून 4.70 टक्के केला आहे. पूर्वी तो 4.60 टक्के होता.
त्याचप्रमाणे 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ते 5.45 टक्क्यांवरून 5.60 टक्के करण्यात आले आहे.
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी आता 5.50 टक्क्यांऐवजी 5.65 टक्के व्याज मिळेल.
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, त्याचा दर 5.60 टक्क्यांवरून 5.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी FD 5.65 टक्क्यांवरून 5.85 टक्के करण्यात आली आहे.
SBI वेकेअर ठेव काय आहे?
SBI त्यांच्या Vacare ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेचा वैधता कालावधी पुढील वर्षी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवेल. ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी ठेवींवर 30 बेस पॉइंट अतिरिक्त प्रीमियम व्याज मिळते. पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर सामान्य नागरिकांपेक्षा ०.५० टक्के अधिक व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल मुदत ठेवींवर 0.80 टक्के (0.50 +0.30) अधिक व्याज मिळेल.
तर SBI बँकेने केलेली ही फिक्स डिपॉसिट मधील व्याजदरात केलेली वाढ सध्याच्या महागाईच्या काळात तुम्हाला नक्कीच आवडली असेल.