Anna Saheb Patil Loan Scheme अण्णा साहेब पाटील कर्ज योजना:-

 Anna Saheb Patil Loan Scheme अण्णा साहेब पाटील कर्ज योजना:-



आजच्या घडीला नोकर्‍यांचा प्रश्न ऐरणीवर असताना आजचा तरुण वर्ग हा बेरोजगार झालेला आपण बघतो. त्यासाठी सरकार काही नवीन पाऊले उचलण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे शालेय शिक्षणाबरोबर स्वयं रोजगार निर्माण होईल. पण या सगळ्या गोष्टी या जर तरच्या, पण आताचा जो तरुण बेरोजगार वर्ग आहे त्यासाठी काहीतरी रोजगार निर्माण व्हायलाच हवा. नुसतं शिक्षण घेऊन काही होत नाही. त्यानंतर हाताला काहीतरी काम पाहिजे. पण आताच्या बेरोजगार तरुणाकडे स्वतःच्या व्यवसायसाठी सुद्धा पैसा नाही आहे. अशा प्रकारे भांडवल निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकार नेहमी प्रयत्नात असते.  म्हणून  राज्य सरकार द्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णा साहेब पाटील कर्ज योजना सुरू केलेली आहे. आज आपण या कर्ज योजने विषयी माहिती घेऊ. Anna Saheb Patil Loan Scheme What is Anna Saheb Patil Loan Scheme

What is Anna Saheb Patil Loan Scheme? अण्णा साहेब पाटील कर्ज योजना काय आहे? 


राज्य शासनाने २९ ऑगस्ट १९९८ रोजी आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या बेरोजगार तरुण मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले. त्यानुसार तरुण उमेदवारांना स्वयंरोजगारची माहिती व मार्गदर्शन तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. 

महाराष्ट राज्य शासनाने सन २००० मध्ये या योजनेची अमलबजावणी केली त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगारांना स्वयं रोजगार निर्माण करून व त्यासाठी आवश्यक निधी देण्याची जबाबदारी घेतली आहे. What is Anna Saheb Patil Loan Scheme

Objectives of Anna Saheb Patil Loan Scheme अण्णा साहेब पाटील कर्ज योजनेची उद्दिष्ट्ये: - 


१. या योजनेचे मुख्य उदीष्ट्य म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुण जे आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना य योजने  अंतर्गत स्वतःचा  व्यवसाय सुरू करणायसाठी सक्षम बनविणे.

२. अण्णा साहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत बेरोजगार तरुणांना स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 

३. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणणे.

४. स्वतःच्या मालकीचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी तरुणांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज पडू नये, असे या योजनेचे उद्दिष्ट्य आहे. 

५. बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास, रोजगार प्राप्ती आणि स्वरोजगाराकरिता मार्गदर्शन व सहाय्य करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.

६. राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे. राज्याचा औद्योगिक विकास साध्य करणे. What is Anna Saheb Patil Loan Scheme


How does Anna Saheb Patil Loan Scheme provide loans?अण्णा साहेब पाटील कर्ज योजना कशा प्रकारे कर्ज देते:-  


अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे १. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I), २. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) आणि ३. गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) अशा प्रकारच्या कर्ज योजना राबविल्या जातात. What is Anna Saheb Patil Loan Scheme

१.Personal loan interest repayment plan वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) – 

या योजने नुसार तरुण बेरोजगार हे १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. सदरचे कर्ज घेतल्या नंतर या कर्जाचा परतावा हा ५ वर्षापर्यंत करावयाचा असतो व याचा व्याजाचा दर हा १२ टक्क्यांपर्यंत असतो. महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरुपात अदा करते. पहिला हफ्ता हा 3 लाख रुपयां पर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवर असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता असणे देखील आवश्यक आहे. What is Anna Saheb Patil Loan Scheme

यासाठी पात्रता :- 

१. ही योजना तरुण बेरोजगार हा त्याच्या वय वर्षे ५० पर्यन्त मिळवू शकतो तसेच बेरोजगार महिला ही तिच्या वयाच्या ५५ वर्षे पर्यन्त घेऊ शकते. 

२. अशा उमेदवारचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपयांच्या आत असेल तरच या योजनेचा फायदा  मिळू शकतो. 

३. तसेच या उमेदवाराने या आधी अशा योनेचा लाभ घेतलेला नसावा. 

२. Group Loan Interest Repayment Scheme गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) – 

या योजनेंतर्गत कर्जसाठी पात्र असणारे संस्था किंवा गट म्हणजेच भागीदारी संस्था, सहकारी संस्था,बचत गट, एल.एल.पी.,कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत आहेत. या योजने अंतर्गत ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. अशा प्रकारे कर्ज घेतल्यानंतर याचा व्याज परतावा हा 5 वर्षांपर्यंत असतो व व्याजाचा दर हा १२ टक्क्यांपर्यंत असतो. What is Anna Saheb Patil Loan Scheme

यासाठी पात्रता :- 

१. या योजनेसाठी देखील उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रूपए इतके आहे.

२. वयोमर्यादा ही वरील प्रमाणेच पुरुष आणि महिलांसाठी आहे परंतु वयाची अट ही कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना व कंपनी कायदा २०१३ अंतर्गत स्थापना केलेल्या एफ.पी.ओ. व दिव्यांग गटांना लागू असणार नाही.

३. Group Project Loan Scheme गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) – 

या योजनेंतर्गत जे तरुण त्यांचे प्रकल्प तयार करतील त्या प्रकल्पांची किंमत ११ लाख रुपयांपर्यंत असेल, ते उमेदवार अर्ज करू शकतात. अशा प्रकल्पांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्याही पेक्षा जास्त कर्जाची  आवश्यकता असल्यास बँकेचे मंजूरीपत्र व वितरण पुरावा महामंडळाकडे सादर करणे गरजेचे आहे. जर अर्जदार हा शेतकरी असेल तर तो (FPO) या योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतो. तसेच, घेतलेले कर्ज हे ७ वर्षाच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे. तसेच या कर्जाच्या रक्कमेतून घेण्यात आलेली सर्व मालमत्ता ही महामंडळाच्या नावाने गहाण येते हे ही अर्जदारणे लक्षात घ्यावे. कर्जासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असे दोन जामीनदार देणे देखील आवश्यक आहे. What is Anna Saheb Patil Loan Scheme

Required Documents for Anna Saheb Patil Loan Scheme या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: -

१. बँकेचे  कर्ज मंजूर पत्र  

२. व्यवसाय प्रकल्पाचा अहवाल  

३. आधार कार्ड / दुकान अधिनियम परवाना  

४. व्यवसायाचे फोटो  

या योजनेसाठी तुम्हाला www.udyog.mahaswayam.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

Post a Comment (0)
Previous Post Next Post