नियमित कर्ज माफी 50000 अनुदान योजना यादी मध्ये आपलं नांव असं चेक करा. नांव आलं नसेल तर काय करायचं? Karj mafi yadi 2022
आपण देखील शेतीसाठी घेतलेल्या कर्जावरील नियमित कर्जफेडीनंतर अनुदान मिळण्यासाठी पात्र असाल तर ह्या लेखातून आपल्याला ह्याबाबत सर्व काही माहिती समजेल.
शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जमाफी योजना ची 50,000 अनुदान योजना दुसरी यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. तुम्ही देखील शेतकरी असाल तर तुम्ही सरकारच्या ह्या योजनेने नक्कीच सुखावले असाल.
तुमचं नांव 50,000 अनुदान योजनेच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता ह्या दुसऱ्या
यादिनंतर मोठा दिलासा मिळालेला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० रुपयांची मदत ही राज्य सरकार कडून प्रोत्साहन पर देण्यात येत आहे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे फडणवीस सरकारच्या अनुदानाच्या ह्या निर्णयाचं स्वागत शेतकऱ्यांकडून केलं गेलं.
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी 50000 अनुदान योजना दुसरी यादी कशी डाउनलोड करायची? आपलं नाव कुठे पाहायला मिळेल ह्याविषयी तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल ना! म्हणूनच ह्याविषयी अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात आपण वाचूया.
50,000 अनुदान योजना दुसरी यादी अशी पहा
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत कर्जमाफी झाली. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी त्यांच्या कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करत होते, अशा शेतकऱ्यांना नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत 50,000 अनुदान योजनेचा फायदा मिळणार आहे.नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. हे शेतकरी अनुदान अंतर्गत पन्नास हजार अनुदान योजनेची पहिली यादी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर यापूर्वीच अपलोड केलेली होती. त्याचप्रमाणे पहिल्या यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचे वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे.
आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्जमुक्ती पोर्टलवर पन्नास हजार अनुदान योजनेची दुसरी लिस्ट पाहायला मिळाली. ह्या नवीन यादीमध्ये पहिल्या यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 50,000 रुपयांच्या मदतीचा हात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला ह्यातून सहज मिळेल.
आपलं नाव यादीत आहे का ते असं चेक करा.
50,000 अनुदान योजना दुसऱ्या यादीत नाव कसं चेक करायचं ?
शेतकरी मित्रांनो आपण ह्या लेखात 50,000 अनुदान योजनेची संपूर्ण जिल्ह्यनिहाय यादी दाखवणार आहोत. परंतु जर तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं असेल तर इतर वेळी आपण जसं सहज ऑनलाईन चेक करत असू तसं इथे नाही. ला अनुदान यादीत आपलं नांव चेक करायला तुम्हाला सीएससी केंद्र ऑपरेटरकडे जावं लागेल.CSC ऑपरेटर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमची माहिती चेक करतील. जर त्या ठिकाणी तुमची संपूर्ण कर्ज खात्याची माहिती उपलब्ध असेल तर तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे असं समजायला हरकत नाही.
50000 कर्जमाफी अनुदान योजना दुसरी यादी अशी चेक केली जाते.
सर्वात आधी CSC लॉगिन करून घेतलं जातं.
CSC पोर्टलवर महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे सर्च करून आपल्यासमोर पोर्टल ओपन होईल.
आता तुमच्यासारख्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये अनुदान योजनेत दुसऱ्या यादीमध्ये नाव पाहायचं असेल त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी टाका.
आता तुमच्या संपूर्ण कर्ज खात्याची माहिती समोर येईल. जसं की लोन अकाउंट कोणतं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर किती कर्ज आहे. ही माहिती दिसत असेल तर त्या शेतकऱ्याचं नाव त्या यादीमध्ये आहे .
ही माहिती CSC ऑपरेटर तुम्हाला देईल.
जर एखाद्या शेतकऱ्याची डिटेल्स ओपन होत नसेल तर त्या शेतकऱ्याचं नाव 50000 अनुदान योजना दुसऱ्या यादीमध्ये नाही असं समजा.
50000 अनुदान योजना दुसरी यादी आम्ही तुम्हाला ह्या लेखात वाचायला पन्नास हजार अनुदान योजनेची दुसरी यादी डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईट पहा.
50 हजार अनुदान दुसरी यादी कधीपासून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध झाली आहे?
50 हजार अनुदान योजना महाराष्ट्र दुसरी यादी ही 04 नोव्हेंबर 2022 ला राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे.
पन्नास हजार अनुदान दुसऱ्या यादीत नाव असेल तर त्याचा फायदा कसा घ्यायचा ? पुढची प्रोसिजर काय असेल?
शेतकरी मित्रांनो जर तुमचे पन्नास हजार अनुदान योजना दुसऱ्या यादीत नाव असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील CSC केंद्र चालकाकडे जाऊन तुमचं आधार कार्ड प्रमाणीकरण करून घ्यावं लागेल त्यांनंतरच म्हणजे आधार प्रमाणभूत करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जे शेतकरी अनुदान योजना अंतर्गत प्रोत्साहनपर 50 हजार जमा करण्यात येईल.
50,000 अनुदान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार?
पन्नास हजार नियमित कर्जमाफी अनुदान योजने अंतर्गत दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच 50000 प्रोत्साहन पर अनुदान जमा करण्यात येईल. जे शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार प्रोत्साहन पर रक्कम जमा करण्यात येईल.
50,0000 अनुदान दुसऱ्या यादीत नाव आलं नाही तर काय करायचं ?
मित्रानो, तुम्ही प्रामाणिकपणे नियमित कर्ज परतफेड गेली काही वर्ष करत असाल तर तुमचं नांव ह्या यादीत असेलच. 50,000 Anudan Maharadhtra 2nd List मध्ये जर तुमचं नाव आलेलं नसेल परंतु तुम्ही 50,000 अनुदान महाराष्ट्र अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करत असाल तरच तुम्ही नियमित कर्ज माफी अनुदान मिळवण्यास पात्र असाल.तसं नसेल तर मात्र तुम्हाला पुढच्या यादीची वाट पाहावी लागेल. 50 हजार अनुदान पुढच्या यादीत तुमचं नाव नक्की येईल.