एचडीएफसी बँक पर्सनल लोन साठी कशी प्रोसेस करावी | HDFC Bank personal loan process 2024 |
तुम्हाला जर तुमच्या सेविंग केलेल्या पैशापेक्षा जास्त रक्कमेची गरज तुमच्या वैयक्तिक कामासाठी असेल तर तुम्ही बँक मधून कर्ज काढू शकता. कर्ज हे आपण वेगवेगळ्या कारणांसाठी काढू शकतो, म्हणजे घर बांधण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, घरातील एखादी मोठी वस्तू घेण्यासाठी, शिक्षणासाठी, तुमच्या व्यवसायासाठी, शेतीसाठी. अशा प्रकारे तुम्हाला बँक कर्ज देत असते. आणखी एक कर्ज प्रकार म्हणजे पर्सनल लोन. हे लोन तुम्ही घेतले तर त्या कर्जाची रक्कम तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी वापरू शकता. आज आपण एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन कसे घ्यायचे या विषयी जाणून घेऊ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 हे पण वाचा
📱 मोबाईल वरून पाच हजार ते पन्नास हजार पर्यंतचे पर्सनल लोन मिळवा
👉🏻 त्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
पर्सनल लोन याला वैयक्तिक कर्ज असेही म्हणतात. पर्सनललोन साठी कोणतेही तारण ठेवण्याची किंवा बँकला जामीन देण्याची गरज नसते. म्हणून एचडीएफसी बँकेकडून तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. आता आपण हे कर्ज कसे घ्यायचे ते समजून घेऊ.
एचडीएफसी बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे:
आपण एचडीएफसी बँकेकडून जर वैयक्तिक कर्ज घेतले तर त्याचा उपयोग हा तुम्ही तुमच्या घरासाठी, शिक्षणासाठी, तुमच्या प्रवासासाठी, गाडी घेण्यासाठी, लग्नासाठी, वैद्यकीय उपचारासाठी किंवा इतर कुठेही त्याचा वापर करू शकता. ते कर्ज घेण्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे.
१. जर तुमचे वैयक्तिक खाते एचडीएफसी बँकेत असेल तर तुम्हाला पुन्हा खाते उघडावे लागणार नाही. त्यावरच तुम्ही कर्जसाठी अर्ज करू शकता.
२. जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक नसाल तरीही तुम्हाला काहीही अडचण येणार नाही.
३. जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही नेट बँकिंग, एटीएम किंवा एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरून वैयक्तिक लोनसाठी अर्ज करू शकता अथवा तुमच्या जवळील एचडीएफसीच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करू शकता.
४. जे घेतलेले वैयक्तिक कर्ज आहे किती आहे त्यावर त्याची परतफेड करण्यासाठी तुमच्याकडे योग्य कालावधी एचडीएफसी बँकेने ठेवलेला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 हे पण वाचा
📱 मोबाईल वरून पाच हजार ते पन्नास हजार पर्यंतचे पर्सनल लोन मिळवा
👉🏻 त्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
५. एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्ज हे ४० लाखापर्यंत मिळू शकते त्यासाठी व्याजदर हे प्रतिवर्षी १०.२५% इतके आहे. (याचे अपडेट्स हे एचडीएफसी बँकेच्या वेबसाइट वर तपासावे.)
एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते याची यादी खालीलप्रमाणे:
१. अर्जदाराचे ओळखपत्र (ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसेन्स सुद्धा सादर करू शकता.)
२. मूळ निवासी पुरावा ( निवासी पुरावा म्हणजे अर्जदारचा राहण्याचा पत्ता म्हणून तुम्ही विजबिल, आधार कार्ड, मतदान कार्ड सादर करू शकता.)
३. अर्जदाराकडे त्याच्या बँकेचे मागील तीन महिन्याचे स्टेटमेंट त्या अर्जसोबत जोडावयाचे आहे.
४. तसेच मागील सहा महिन्यांचे बँक पासबुक अपडेट असणे गरजेचे आहे.
५. अर्जदाराचे फॉर्म १६ त्या अर्जसोबत असणे गरजेचे आहे.
६. अर्जदाराच्या पगाराचे प्रमाणपत्र.
कर्ज घेणार्या अर्जदाराचे पात्रता निकष :-
१. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
२. अर्जदार हा कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक कंपनीचा कर्मचारी, केंद्र सरकार, राज्य सरकार नाहीतर स्थानिक संस्थेचा कर्मचारी असेल तरीही तो या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतो.
३. अर्जदाराचे वय हे २१ ते ६० वर्षाच्या दरम्यान असावे.
४. अर्जदार ज्या कंपनीत किंवा कुठेही काम करीत असेल तर त्याच्या कामाचा अनुभव हा २ वर्षे किंवा किमान एक वर्षे असावा तर त्याच्या अर्जाचा विचार केला जाईल.
५. अर्जदार जर एचडीएफसी बँकेचा खातेदार असेल तर त्याचे मासिक उत्पन्न हे २५०००/- व अर्जदार हा एचडीएफसी बँकव्यतिरिक्त खातेदार असेल तर त्याचे मासिक उत्पन्न हे ५००००/- इतके आवश्यक आहे.
६. अर्जदाराचे मासिक उत्पन्न व क्रेडिट स्कोअर जर कमी असेल तर तो अर्जदार आपल्या अर्जसोबत सह अर्जदार म्हणून आपली पती/पत्नी, आपले वडील किंवा सह अर्जदार म्हणून एका पात्र उमेदवारा सोबत अर्ज करू शकतो.
एचडीएफसी बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा:-
१. एचडीएफसी बँकेच्या कर्जासाठी जर तुमची पात्रता निश्चित झाली तर तुम्हाला ई कनेक्ट या बटणावर क्लिक करायचे आहे.
२. फॉर्म पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करवयाची आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 हे पण वाचा
📱 मोबाईल वरून पाच हजार ते पन्नास हजार पर्यंतचे पर्सनल लोन मिळवा
👉🏻 त्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
३. सर्व अर्ज भरून सबमिट झाल्यानंतर तुमच्या अर्जाला मंजूरी मिळाल्यावर काही तासात तुमची कर्जाची रक्कम तुम्हाला वितरित केली जाईल.
अशा तर्हेने तुम्हाला एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्जासाठी बँकेत न जाताही ऑनलाइन अर्ज करून कर्ज मिळविता येते. यासाठी एचडीएफसी बँकेचे अधिकृत वेबसाइट वर याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.