शेतकरी विहीर अनुदान योजना | Shetkari vihir anudan |
महाराष्ट्रातील अनियमित पावसामुळे शेतकर्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागते. दारिद्र्य रेषेखालील शेतकरी तसेच कमी उत्पन्न गटातील शेतकरी हे आर्थिक अडचणींमुळे पाण्यासारख्या संकटाशी दोन हात करू शकत नाहीत. शेतामध्ये पाणी संकट सोडविण्यासाठी पाणी सिंचन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतातळे, विहिरी नाहीतर बोअर वेल असणे गरजेचे आहे. पण त्यासाठी पैसा सुद्धा लागतो. हा पैसा गरीब शेतकर्याकडे कुठून येणार? म्हणून राज्य सरकारने मागेल त्याला विहीर अशा मथळ्याखाली शेतकरी विहीर योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शासन विहीर खोदण्यासाठी 4लाख इतके अनुदान देते आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान सरकार देत आहे. या बाबतचा शासन निर्णय ४ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आला. आपण आता या योजनेचा उद्देश, ह्या योजनेसाठी पात्रता, त्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? या संदर्भात माहिती घेऊ.
शेतकरी विहीर योजनेचा उद्देश :-
महाराष्ट्रात जो पाऊस पडतो तो अनियमित स्वरूपाचा असतो. त्यामुळे पाण्याशिवाय शेती होणे केवळ अशक्य आहे. त्यात महाराष्ट्रातील शेतकरी हा गरीब व दारिद्र्य रेषेखालील आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतीचा दर्जा उंचावत नाही तो पर्यन्त त्या शेतकर्याचा विकास होऊ शकत नाही. पण शेतीचा दर्जा उंचावण्यासाठी य शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. जर शेतकर्याला त्याच्या शेतात विहीर, शेतातळे किंवा बोअर वेल बांधून दिली तर त्याला पाण्यासाठी पावसावर किंवा कुणावर अवलंबून रहाव लागणार नाही. पण विहीर खोदण्यासाठी शेतकर्याकडे एवढा पैसा नसतो. त्याला कर्ज देण्यास बँका तयार नसतात मग त्याला ते कर्ज सवकरकडून घ्यावे लागते. अशा परिस्थितीत त्याचे कर्ज फेडणे दूरच पण ते कर्ज पिढ्या दर पिढ्या वाढतच जाते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्य सरकारने काही अनुदान योजना आणल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे शेतकरी विहीर अनुदान योजना आहे.
शेतकरी विहीर योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत? :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे पात्रता निकष आहेत.
१. अर्जदार शेतकर्याकडे त्याच्या स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
२. शेतीच्या सिंचनासाठी विहीर खोदताना ती पिण्याच्या पाण्याच्या विहीरीपासून ५०० मीटर अंतराच्या बाहेर असली पाहिजे.
३. शेतकरी हे सामुदायिक विहीरीसाठी ही अर्ज करू शकतात. पण त्या शेतकर्यांच्या जमिनी ह्या सलग ४० गुंठे एकमेकांना जोडणार्या असल्या पाहिजेत तसेच तसा पंचनामा आणि सामोपचाराने पाणी वापरबाबत करारपत्र सादर करणे गरजेचे आहे.
४. ज्या जमिनीतील विहीरीसाठी अर्ज केलेला आहे ती जमीन खोदण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या योग्य असली पाहिजे.
५. अर्जदार शेतकर्याने याआधी विहीर,शेतातळे, सामुदायिक तळे या योजनांचा लाभ घेतला असेल तर तो अर्जदार शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
शेतकरी विहीर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
१. अर्जदार शेतकर्याकडे स्वतःच्या नावावर जमिनीचा सात बारा असला पाहिजे.
२. ८ अ च उतारा असणे आवश्यक आहे.
३. बंधपत्र
४. जमिनीचा नकाशा
५. राष्ट्रीयकृत बँकेत स्वतःच्या नावावर बँक खाते
६. बँक खाते हे आधार आणि पॅन कार्ड शी संलग्न असणे गरजेचे आहे.
७. जात प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
८. तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्याकडून विहीरीसाठी तांत्रिक स्वीकृती प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
९. सामुदायिक विहीरीसाठी सर्व सह मालकांकडून सहमतीपत्र
१०. अर्जदार शेतकरी हा मनरेगा जॉब कार्ड धारक असावा.
शेतकरी विहीर योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा?
१. शेतकरी विहीर योजनेसाठी ग्राम पंचायत कार्यालयात करावयाचा आहे.
२. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होतील त्यावेळी ते अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहेत.
३. शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर अर्जाचा नमूना दिला आहे त्याप्रमाणे अर्ज करावा.
४. अर्ज केल्यानंतर अर्जदारला समतीपत्रक सुद्धा देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना आणली तरी महाराष्ट्र राज्य हे आकारमानाने खूप मोठे राज्य आहे. प्रत्येक भागाची स्थानिक आणि भौगोलिक स्थिति ही भिन्न असल्यामुळे प्रत्येक भागासाठी विहीरीचा दर आणि आकार निश्चित करणे केवळ अशक्य आहे.
या अशा स्थितीमुळे विहिरीच्या कामासाठी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल.
अशा प्रकारे शेतकरी विहीर योजनेचा उद्देश आणि त्याची पात्रता आणि अर्ज करावयाची पद्धत सांगितली आहे.