पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/PMMY SBI Mudra Loan Online |
(PMMY) पंतप्रधान एसबीआय कर्ज योजना
ही एक अशी कर्ज योजना आहे ज्यात कोणत्याही उद्योजकाला त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, एखाद्या लघु उद्योजकाला आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी, तसेच सर्व क्षेत्रातील कंपन्या, पुरवठादार, दुकानदार यातील कुणीही SBI एसबीआय मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पण वाचा
मोबाईल वरून लोन मिळवा त्यासाठी येथे क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
केंद्र सरकारने सन २०१५ मध्ये लघुउद्योजकांसाठी पंतप्रधान मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५०००० हजारांपासून १० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/कर्ज योजनेचा उद्देश (PMMY):-
पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/कर्ज योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे स्वयं रोजगारासाठी सोपे कर्ज निर्मिती आणि दुसरे म्हणजे छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असेल तर ते भांडवल तुम्ही पंतप्रधान एसबीआय मुद्रा कर्ज योजने अंतर्गत अर्ज करून मिळवू शकता.
असे कर्ज मिळाल्यास स्वयं रोजगारासाठी जनतेला प्रेरीत करण्यास चालना मिळेल तसेच स्वयं रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असा सरकारचा विचार आहे. छोट्या उद्योगांसाठी कर्ज घेण्यासाठी बँकांचे खूप मोठे प्रोसिजर पुरे करावे लागतात. पण पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/कर्ज योजनेमुळे अल्प दरात जुजबी कागदपत्रांच्या आधारे ही कर्ज प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/कर्ज
योजने अंतर्गत कर्जाचे प्रकार
(PMMY):-
पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/कर्ज योजने अंतर्गत जे खालील प्रकारे कर्ज दिले जाते.
१. शिशु कर्ज :- शिशु कर्ज म्हणजे या कर्जाची रक्कम ही अत्यंत कमी म्हणजे ५०००० हजार रुपयांपर्यंत असते. म्हणून या कर्जाला शिशु कर्ज असे म्हटले जाते. ज्यावेळी तुम्ही प्रथम आपल्या व्यवसायास सुरुवात करता त्यावेळी कोणत्याही हमी शिवाय तुम्हाला ५ वर्षासाठी ५०००० हजार इतके कर्ज दिले जाते.
२. किशोर कर्ज:- किशोर कर्ज म्हणजे जे व्यवसायिक आपला व्यवसाय वाढवू इच्छित असतील तर ते कर्ज हे ५०००० हजारांपासून ५ लाख पर्यंत कर्ज घेऊ शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पण वाचा
मोबाईल वरून लोन मिळवा त्यासाठी येथे क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३. तरुण कर्ज:- हे कर्ज व्यवसायिक आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी ५ लाखापासून १० लाखांपर्यंत घेऊ शकतात. या कर्जाला तरुण कर्ज असे म्हटले जाते.
पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/कर्ज योजने अंतर्गत पात्रता निकष
(PMMY) :-
१. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
२. ज्या अर्जदाराला स्वयं रोजगार सुरू करायचा आहे तसेच ज्याला स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे तो या कर्जास पात्र आहे.
३. अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असले पाहिजे. अर्जदार हा वयाच्या ६५ वर्षापर्यंत हे कर्ज घेऊ शकतो.
पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/कर्ज योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
(PMMY) :-
१. अर्जदाराचे आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायविंग लायसेन्स किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही एखादा पुरावा हा अर्जदाराच्या ओळख प्रमाणपत्रासाठी आवश्यक आहे.
२. रहिवासी दाखल्यासाठी टेलिफोन बिल, विजबिल किंवा आधार कार्ड यापैकी एक पुरावा आवश्यक आहे.
३. व्यवसाय किंवा उद्योग सबंधित संपूर्ण तपशील, यंत्र सामग्री व खरेदी करावयाच्या वस्तूंचे कोटेशन बील प्रस्तुत करणे आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पण वाचा
मोबाईल वरून लोन मिळवा त्यासाठी येथे क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४. जातीचा दाखला तसेच जर SC/ST/OBC/अल्पसंख्यांक श्रेणीशी संबंधित असल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
५. बँक खाते आण ते आधार आणि पॅन कार्डशी सल्ग्न असणे गरजेचे आहे. तसेच मागील सहा महिन्यांचे स्टेटमेंट.
६. व्यवसायाचा पत्ता, नोंदणी प्रमाणपत्र, शॉप अॅक्ट लायसन्स.
पंतप्रधान एसबीआय मुद्रा लोन/कर्ज योजने अंतर्गत अर्ज कुठे कराल?
(PMMY):-
या योजनेसाठी तुम्ही ऑन लाईन किंवा ऑफ लाईन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुमची कागदपत्रे या अर्जा बरोबर जोडावी लागतील. अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करून झाल्यानंतर मुद्रा लोन/कर्ज एका महिन्यात तुमच्या बँक खात्यात जमा होईल.