घरकुल यादी चे पैसे आले आहेत की नाहीत कसे चेक करायचे | Gharkul yadi 2024 Updates |

 घरकुल यादी चे पैसे आले आहेत की नाहीत कसे चेक करायचे | Gharkul yadi 2024 Updates |



घरकुल योजनेच्या यादी मध्ये तुमचे नाव जाहीर झाले असेल तर आता प्रतीक्षा फक्त पैसे आपल्या खात्यात येण्याची आहे. खर तर पैसे आपल्या खात्यात यायला  सुरुवात झाली आहे. आपण आज आलेले पैसे कसे चेक करायचे याची माहिती घेणार आहोत. या आधी आपण ही घरकुल योजना काय आहे याची माहिती घेऊ. या योजने अंतर्गत दरवर्षी या योजनेत आपण आपले नाव नोंदवू शकतो आणि आपले नाव त्यात जाहीर होते. पण ही प्रक्रिया काय आहे याची माहिती आपल्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना   नसते. त्यासाठी हा लेख वाचा. 

प्रधानमंत्री आवास योजना (प्रधानमंत्री घरकुल योजना):

प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल योजना आहे. ही योजना २०१६ साली देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत, ग्रामीण भागात राहणारे म्हणजेच गरीब कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यांना घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून बनविण्यात आली आहे. या योजनेचे  उद्दीष्ट हे २०२२ पर्यन्त साध्य करण्याचे होते.


🏦 घरकुल साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


 या योजने अंतर्गत अर्जदाराला २५ स्क्वेअर मिटरचे घर बांधता येते. महाराष्ट्रासारख्या मैदानी राज्यात देयक रक्कम १ लाख २० हजार तर हिमाचल प्रदेश सारख्या पर्वतीय राज्यांमध्ये १ लाख तीस हजार इतकी रक्कम दिली जाते. ही रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाते. या निधीचे वाटप हे खालीलप्रमाणे विभागलेले आहे. 

१. मैदानी राज्यांसाठी ६०% इतकी रक्कम केंद्र सरकर देणार तर ४०% इतकी रक्कम राज्य सरकार देणार.

२. पूर्वेकडील राज्यात ९०% इतकी रक्कम केंद्र सरकार तर १०% इतकी रक्कम राज्य सरकार देते. 

ज्या लाभर्थ्यांना घरकुल योजने अंतर्गत घरकुल लाभलेले आहे त्यांना स्वच्छ भारत योजने अंतर्गत, शौचालायसाठी वेगळा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. 

प्रधानमंत्री घरकुल योजनेची लाभार्थी यादी कशी पाहायची:-

प्रधानमंत्री घरकुल लाभर्थ्यांची यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर लिंक डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला pmay.nic.in ही लिंक शोधावी लागेल. या लिक वर क्लिक करून तुम्हाला हे पेज ओपेन होईल. यात तुम्हाला तीन पर्याय दिसतील. या तीन पर्यायापैकी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या पर्यायावर क्लिक केल्यावर या योजनेत किती लाभर्थ्यांना ही योजना मंजूर झाली? त्यापैकि किती घरकुले पूर्ण झाली? किती निधी लाभर्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला? याची सविस्तर माहिती दिसेल. 


🏦 घरकुल साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


यातच तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका सिलेक्ट करून तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी पहायची असेल ते टाकल्यानंतर तुमच्या समोर ते पेज ओपन होईल त्यात तुम्ही बेरीज वजाबाकीच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर तुम्हाला सबमिट हा ऑप्शन येईल तो सबमिट झाल्यावर  तुमच्या गावातील कुणाकुणाला य योजनेचा लाभ मिळाला हे दिसेल. 

घरकुल यादीचे पैसे आले आहेत की नाहीत कसे चेक करायचे?

आपण आता घरकुल योजनेचे पैसे आले आहेत ही नाही याची खात्री करून घेऊ शकतो. दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी हाती आलेल्या शासन निर्णयाचा मजकूर पुढीलप्रमाणे. 

१. घरकुल योजने अंतर्गत केंद्र शासनाचा पहिल्या हप्त्याचा  दूसरा भाग रुपये ८५,४९,२५,०००/- तर राज्य शासनाचा ५६,९९,५०,०००/- इतका निधी वितरित करण्याचा शासन निर्णय हा दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी पारित करणायात आला आहे. 


🏦 घरकुल साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


२. हा निधी लवकरच पत्र लाभर्थ्यांच्या बँकेत जमा केला जाणार आहे. या शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे. 

आता आपले पैसे आले आहेत हे तुम्ही तुमच्या मोबाइल वर सुद्धा चेक करू शकता. 

१. त्या करिता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरील गूगल वर pmayg.nic.in हे सर्च करायचे आहे. 

२. हे सर्च  झाल्यावर तुम्हाला पीएम घरकुल योजनेचे पेज ओपन होईल. त्या पेजवर डाव्या बाजूला तीन डॉट दिसतील  त्यावर क्लिक करून डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे. 

३. त्यानंतर जे पेज ओपन होईल तिथे पाच नबरच्या स्टेक होल्डर्स या ऑप्शन वर क्लिक कारचे आहे. 

४. त्यावर क्लिक केल्यावर PMAYG beneficiary या ऑप्शन वर क्लिक केल्यावर आपला रजिस्टर नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे सर्व स्टेटस ओपेन होईल. या पेजवर तुमचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव, तुमचे बँक डिटेल्स सर्व असेल आणि त्याखाली तुमचे पेमेंट झाले किंवा किती झाले याची सर्व माहिती दिसेल.


🏦 घरकुल साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post