इंडिया पोस्ट ऑफिस भरती फक्त दहावी पास / india post GDS Recruitment 2024
India Post GDS Recruitment 2024 – पोस्ट ऑफिसमध्ये नवीन भरती २०२४. ४४००० पेक्षा जास्त पदे रिक्त
भारतीय पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) मधील रिक्त पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू केली गेली आहे अशी एकूण ४४,४२८ पदे रिक्त आहेत.
नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना त्यांचे योग्य कागदपत्रे अपलोड करण्याकरिता आणि भारतीय पोस्ट GDS अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या दोन दिवसांचा वेळ दिला जाईल. खालील पदांसाठी भरती सुरू आहे.
• ब्रांच पोस्टमास्तर (BPM),
• डाक सेवक आणि
• असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ५ ऑगस्टपर्यंत indiapostgdsonline.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
India Post GDS Recruitment 2024 – भारतीय पोस्ट जीडीएस भरती प्रक्रिया २०२४ नुसार पात्रता निकष पुढीलप्रमाणे :-
• अर्जदाराचे वय किमान १८ ते कमाल ४० वर्षे इतके दिलेले आहे. ( राखीव श्रेणीसाठी वयोमर्यादेत सूट देण्याची तरतूद केलेली आहे. अर्जदाराच्या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपासून वयाची गणना केली जाईल.)
• अर्जदार हा मान्यताप्राप्त विद्यपीठाकडून अनिवार्य इयत्ता १० वी उत्तीर्ण तसेच एस एस सी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ( अर्जदाराचे इंग्रजी व गणित दोन्ही विषयांची पात्रता असणे आवश्यक आहे.)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
• इयत्ता १० पर्यन्त स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा विभागाद्वारे मंजूर केलेल्या पोस्टनिहाय स्थानिक भाषेसाठी तपशीलवार परिशिष्ट-III नुसार.
• अर्जदाराला संगणकाचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. अर्जदारच्या उपजीविकेचे पुरेसे साधन असणे आवश्यक आहे.
• अर्जदारला सायकल चालविता येणे आवश्यक आहे.
• आंध्र प्रदेशसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आदिवासी भाषेसह १० वीपर्यंत हिंदी किंवा इंग्रजीचा अभ्यास केलेला असावा.
India Post GDS Recruitment 2024 payment skill – भारतीय पोस्ट जीडीएस भरती प्रक्रिया २०२४ नुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे:-
अर्ज आणि कागदपत्रे आपलोड केल्यानंतर अर्जदाराच्या गुणवत्तेनुसार निवड केली जाईल. आणि अर्जदाराला त्याच्या पदांनुसार वेतन श्रेणी दिली जाईल.
• पोस्ट ऑफिस GDS, ABPM आणि GDS पोस्टचा पगार १०००० रुपये ते २४४७० रुपये प्रति महिना असेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
• बीपीएम पदाचा पगार १२ हजार ते २९,३८० रुपयांपर्यंत आहे.
या बद्दल कोणतीही अधिकृत आणि तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर तपासून पहावे.
India Post GDS Recruitment 2024 – भारतीय पोस्ट जीडीएस भरती प्रक्रिया २०२४ अंतर्गत खालील पदे भरली जातील:-
भारतीय पोस्ट अन्वये एका शॉर्ट नोटीसनुसार ३५ हजार पदे भरली जातील असा अंदाज होता. परंतु या भरती प्रक्रियेत यापेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे.
भारतीय पोस्टच्या GDS भरतीद्वारे, ४४ हजार २८८ पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ही पदं आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, पंजाब, यूपी, उत्तराखंड, एमपी, राजस्थान, झारखंड इत्यादींसाठी आहेत.
India Post GDS Recruitment 2024 – भारतीय पोस्ट जीडीएस भरती प्रक्रिया २०२४ नुसार निवड प्रक्रिया
• भारतीय पोस्ट मध्ये भरती होण्यासाठी अर्जदारांच्या १० वी उत्तीर्ण गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे.
• शॉर्ट लिस्ट मध्ये आलेल्या अर्जदारना अधिकृत GDS पोर्टलवर सिस्टिम व्युत्पन्न गुणवत्ता जारी केली जाईल.
• अर्जदारांनी त्यांचा मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.
• अर्जदारांना त्यांचे निकाल हे कागदपत्रांच्या पडताळणी नंतर योग्य तारखेची माहिती अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे दिली जाईल.
• नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना त्यांचे योग्य कागदपत्रे आपलोड करण्याकरिता आणि भारतीय पोस्ट GDS अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या दोन दिवसांचा वेळ दिला जाईल.